Description
विचार विश्वातील आकर्षणाचा नियम” हा विल्यम वॉल्टर अटकिन्सन यांच्या १९०६ साली प्रकाशित झालेल्या “Thought Vibration, or the Law of Attraction in the Thought World” या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. आपले विचार हे केवळ मानसिक प्रक्रिया नसून एक प्रकारची स्पंदने (vibrations) आहेत, आणि याच स्पंदनांच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यात समान गुणधर्माच्या घटना, व्यक्ती आणि परिस्थिती आकर्षित करतो, हा मध्यवर्ती विचार या पुस्तकातून मांडला आहे. सकारात्मक विचारसरणी अंगीकारून भीती, चिंता आणि नकारात्मकतेवर मात कशी करावी, तसेच आत्मविश्वास, यश आणि समृद्धीच्याय दिशेने विचारांची दिशा कशी वळवावी, याचे व्यावहारिक मार्गदर्शन लेखकाने दिले आहे. “लॉ ऑफ अट्रॅक्शन” या संकल्पनेच्या सुरुवातीच्या आणि मूलभूत ग्रंथांपैकी एक मानले जाणारे हे पुस्तक आजच्या आधुनिक सकारात्मक मानसशास्त्र आणि आत्मविकास चळवळीचा पाया मानले जाते. आत्मविकास, मानसशास्त्र आणि सकारात्मक जीवनशैली यांत रस असणाऱ्या वाचकांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.




