गोपाळकालाच्या दिवशी लायब्ररीत आलेली रुक्मिणी… हा फक्त योगायोग होता?
शनिवार, दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोजी गोपाळकाला होता आणि त्या दिवशी एक अप्रतिम योगायोग झाला लायब्ररीमध्ये!
त्या दिवशी संध्याकाळी एका मुलीचा कॉल आला. तिला एक मीटिंग होस्ट करण्यासाठी जागा हवी होती. तर तिने कॉल केला. मी तिला बोललो की, “आहे जागा, येऊ शकतात तुम्ही.”
तर ती आली. तिचं नाव विचारलं मी तिला, तर तिचं नाव होतं रुक्मिणी. म्हणजे गोपाळकालाच्या दिवशी रुक्मिणी आमच्या लायब्ररीमध्ये आली! ते नाव ऐकून मला खरंच असं वाटलं की, कृष्णानेच पाठवलं आहे तिला! आणि त्यातल्या त्यात अजून मोठी गोष्ट म्हणजे, ती मला वाटतं स्पॅनिश होती आणि इस्कॉन टेम्पलची अनुयायी असेल कदाचित ती, कारण तिच्या गळ्यात मी तुळशीची माळ बघितली, मस्तपैकी.
हा योगायोग म्हणजे खरंच अप्रतिम होता!
काही योगायोग असे असतात ना, की ते फक्त योगायोग वाटत नाहीत… त्यामागे कुठेतरी एक सुंदर संकेत दडलेला आहे असंच वाटतं.
गोपाळकालाच्या दिवशी रुक्मिणी आमच्या लायब्ररीमध्ये आली – हा क्षण आणि हा योगायोग कायम लक्षात राहील! 🙏💙